Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

नाशिक TCS Bad Queen निदा खान पोलिसांच्या जाळ्यात.

नाशिक पोलिसांची कामगिरी

निदा खान ला छत्रपती संभाजी नगरमधून घेतले ताब्यात.
नाशिक: प्रतिनिधी
टीसीएस धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कंपनीत काम करणारी निदा खान चा यात सहभाग असल्याचे उघड झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी कंपनीतील एच आर मॅनेजर चैनानी सह इतर सर्व सहभागी संशयित आरोपींना अटक केली होती. हे सर्व जण सध्या कोठडीत आहेत. परंतु निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाली होती. तिने नाशिकरोड येथील न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ती गर्भवती असल्याने तिला जामीन द्यावा, अशी याचिका निदा खान च्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यासाठी वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. मात्र नाशिकरोड न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला होता, त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खान च्या कुटुंबाची मध्यंतरी माजी खासदार इम्तियाज जमील यांनी भेट घेऊन तिच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला होता तर निदा खान पोलिसांना चकमा देत असल्याने तिच्या शोधासाठी तीन वेगवेगळे पथके तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी मुंब्रा येथून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मात्र तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. तथापि, ती छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांना समजताच गुन्हे शाखा आणि देवळाली कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजी नगर येथून निदा खान ला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!