
मुंबई प्रतिनिधी : अतिवृष्टी च्या पाश्वभूमीवर शासनाने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तसेच सुट्टी असल्याने कोणीही पर्यटन स्थळी जाऊ नये असे आवाहन देखिल केले आहे.
खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून आदेशाचे पालन ‘न’ केल्यास कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.




