E-Paperमहाराष्ट्रलोकल न्यूज़

समृद्धीचा थाट; पण..शेजारील रस्ताची लागली वाट…

पुणे - नवीमुंबई - नाशिक जोडणाऱ्या रस्ताची झाली चाळण

भिवंडी प्रतिनिधी : कित्येत कोटी रुपये खर्च करून भरमसाठ टोल आकारून मुंबईवरून नागपूर चा प्रवास सुखकर झाला खरा; परंतू अब्जो रुपये कमवून देणारा भिवंडी तालुक्याची परिस्थिती जैसे थे ठेवणाऱ्या प्रशासनाला नागरिकांच्या शिव्या – शाप बसल्याशिवाय गत्यतर नाहीच.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातील आमने गावातून जातो. समृद्धी तयार होतांना आमने नावाचा गाजावाजा सर्वच न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रात गाजत होता. समृद्धी होण्यापूर्वी नवी मुंबई – पुणे – नाशिक या छोट्या महामार्गला जोडणारे आमने गाव वंचित होते तसे वंचितच राहिले. हजारो कर्मचारी वर्गाची भिवंडी तालुक्यात असणाऱ्या वेअर हाऊस ला रोजची ये – जा याच आमने परिसरातून होतं असते. करोडोची रोजचीच उलाढाल आणि या उलाढालीसाठी लागणारा नोकरवर्ग, मोठं मोठे ट्रेलर, दुचाकी, चारचाकी यांचे वाहन चालक कोणत्या परिस्थितीचा सामना करत असतील हे प्रशासनाने बघणे गरजेचे आहे.
सदर रस्तामुळे जीव तर जातीलच पण तडपवून तडपवून जीव घेणे कोणत्या कायद्यात बसते याचा अभ्यास प्रशासनाने करणे खूप गरजेचे आहे.

सदर जीवघेण्या रस्ताचा व्हिडीओ बातमीतील खबर 24 LIVE या यूट्यूब चॅनलच्या लिंक वर बघण्यास मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!