Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperक्राइमलोकल न्यूज़

‘मित्र गारव्या मध्ये वणव्या सारखा’ : रिसॉर्ट मध्ये मैत्रिणीचा केला घात

नाशिकमध्ये कारखाली दबून महिलेचा मृत्यू; अपघाताचा बनाव उघड, वाडीव-हे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवीन नाशिक प्रतिनिधी : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण्यासाठी आणि फिरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा कारखाली चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना वाडीव-हे परिसरातील सांजेगाव शिवारात उघडकीस आली. रुपाली नीळेश पाटील (३५, रा. शिवनारायण अपार्टमेंट, कामटवाडे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा मित्र दीपक शिवाजी सैदाणे (४३) याला वाडीव-हे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपीने अपघाताचा बनाव केला; मात्र पोलिसांच्या चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिडको परिसरातील कामटवाडे येथील फडोळ मळ्यात शिवनारायण अपार्टमेंट आहे. याच अपार्टमेंटमध्ये रुपाली पाटील आणि संशयित दीपक सैदाणे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते.
मंगळवारी (दि. १८) सकाळी दोघे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी कारने (एमएच ०३ एए ४५५२) वाडीव-हे परिसरात गेले होते.

दोन्ही कुटुंबांना जबर मानसिक धक्का
▪️ रुपाली पाटील या एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरीला होत्या.
▪️ त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू-सासरे आणि भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
▪️ दुसरीकडे, दीपक सैदाणे हा एका खासगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. दोघेही एकाच अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसह राहत असल्याने या घटनेने सिडको आणि कामटवाडे परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्यप्राशनानंतर वाद; पोलिस कारवाईची धमकी दिल्याचा राग
वाडीव-हे परिसरात फिरत असताना दीपकने मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान रुपाली यांनी दीपकला पोलिस कारवाईची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. याचा राग दीपकच्या मनात राहिला.
यानंतर दोघे सांजेगाव शिवारातील एका रिसॉर्टजवळ गेले. रुपाली कारमधून खाली उतरत असताना दीपकने त्यांच्या अंगावर कार घातल्याचे पोलिसांनी सांगितले. कारखाली चिरडल्याने रुपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

खून केल्यानंतर अपघाताचा बनाव
घटनेनंतर पोलिसांना संशय येऊ नये यासाठी दीपकने हा अपघात असल्याचा बनाव केला. रुपाली यांचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सुरुवातीला मृत रुपाली यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाती मृत्यूची अकस्मात नोंद केली.
मात्र, घटनास्थळाची परिस्थिती आणि घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने वाडीव-हे पोलिसांचा दीपकवरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

वरिष्ठ निरीक्षकांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी दीपकची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दीपकने अखेर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला.
यानंतर पोलिसांनी बुधवारी अकस्मात मृत्यूच्या नोंदीत खुनाचे कलम वाढविले आणि दीपकला बुधवारी संध्याकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास वाडीव-हे पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!