E-Paperएज्यूकेशनमहाराष्ट्र

पुढील शैक्षणिक वर्षात नवी पुस्तके बालभारतीकडून काम सुरू; पाचवी, सातवी, नववी अन् अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार

पुढील शैक्षणिक वर्षात नवी पुस्तके
बालभारतीकडून काम सुरू; पाचवी, सातवी, नववी अन् अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार
पुणे, ता. १९ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांच्या हाती वेळेत नवीन पाठ्यपुस्तके पडावीत, यासाठी बालभारतीने नव्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यावर काम सुरू केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ या आधारे राज्यात इयत्ता तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या …
शैक्षणिक वर्षानिहाय नव्या अभ्यासक्रमाचे टप्पे
२०२५-२६ — इयत्ता पहिली
२०२६-२७ — इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी
२०२७-२८ — इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी
२०२८-२९ — इयत्ता आठवी, दहावी आणि बारावी
अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित नवीन अभ्यासक्रम राज्यात तयार करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्यावर्षी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) पहिलीची आणि यंदा (शैक्षणिक वर्ष २०२६-२७) दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने (बालभारती) तयार केली. परंतु, यंदा दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या मसुद्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याला नुकतीच समितीची मान्यता मिळण्यात हिरमाई झाली. परिणामी, छपाईच्या कामकाजाला उशिराने सुरुवात झाली.

‘एनसीईआरटी’च्या नियोजित टप्प्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यानुसार नवीन पाठ्यपुस्तकांचीही निर्मिती केली जाईल. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, म्हणून बालभारतीने आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे.
पाचवी आणि सातवीचा अभ्यासक्रम जानेवारीत, तर नववीचा फेब्रुवारीपर्यंत तयार होईल. त्यानंतर अकरावीचे काम हाती घेतले जाईल. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर त्या-त्या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम केले जाईल आणि पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वेळेत नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मिळतील यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
– अनुराधा ओक, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती)

नवीन अभ्यासक्रमाच्या मसुद्यावर सध्या बालभारतीत काम सुरू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!