E-Paperलोकल न्यूज़

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी नगरसेविका भाग्यश्री राकेश ढोमसे व भाजपा पदाधिकारी राकेश शिवाजी ढोमसे यांच्या तर्फे मदतीचा हात

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सौ. सीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राकेश शिवाजी ढोमसे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दिला.
या निधीचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दुष्काळाच्या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, डॉ. वैभव महाले, अरुण दातीर, समाधान दातीर, प्रवीण पाटील, निखिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
“शेतकरी बांधवांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीसाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे,” असे राकेश शिवाजी ढोमसे यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ढोमसे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!