
खबर 24 LIVE पर्यटन विशेष
महिलांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे चालणारे संपूर्ण रिसॉर्ट; मृणालिनी वाड यांच्या सक्षम व्यवस्थापनाचा प्रेरणादायी आदर्श!
रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिवेआगर हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. अथांग समुद्र, स्वच्छ किनारा, नारळी-पोफळीच्या बागा आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे दिवेआगरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अशाच या सुंदर पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे ‘बीच सिम्फनी रिसॉर्ट’.
या रिसॉर्टचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथील संपूर्ण व्यवस्थापन महिलांच्या हातात आहे. मृणालिनी वाड या महिला अत्यंत आत्मविश्वासाने, सक्षमतेने आणि कुशलतेने या रिसॉर्टची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. केवळ रिसॉर्ट चालवणे एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नसून, महिलाही पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात उत्तम नेतृत्व करू शकतात, याचा एक सकारात्मक संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.
आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. उद्योग, व्यवसाय, सामाजिक कार्य, शिक्षण आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ‘बीच सिम्फनी रिसॉर्ट’ हे त्याचेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणता येईल. संपूर्ण व्यवस्थापन महिलांकडे असणे ही केवळ या रिसॉर्टची वेगळी ओळख नसून महिला सक्षमीकरणाचा एक सुंदर प्रत्यय आहे.
दिवेआगरला पर्यटनासाठी येणाऱ्या कुटुंबांसाठी, मित्रपरिवारासाठी आणि निसर्गाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे रिसॉर्ट आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. महिलांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनातून पर्यटकांना आपलेपणाची आणि आदरातिथ्याची अनुभूती मिळावी, हा या उपक्रमाचा सकारात्मक पैलू आहे.
पर्यटनासोबतच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे ‘बीच सिम्फनी रिसॉर्ट’!
दिवेआगरला भेट देण्याचा बेत आखत असाल, तर आपल्या पर्यटनाच्या यादीत ‘बीच सिम्फनी रिसॉर्ट’चा नक्की समावेश करा. निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेतानाच महिलांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला सलाम करण्याची ही एक उत्तम संधी आहे!



