पीपल विथ डिसेबिलिटी तर्फे दिव्यांगांच्या पंखांना बळ – दत्तु बोडके

पीपल विथ डिसेबिलिटी तर्फे दिव्यांगांच्या पंखांना बळ – दत्तु बोडके
नाशिक प्रतिनिधी : पीपल विथ डिसेबिलिटी पुणे यांच्यातर्फे नाशिक शहरातील दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले नाशिक महानगरपालिका दिव्यांग भवन येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले, दिव्यांगांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते त्या संधीचे निश्चितच सोने करतात पीपल विथ डिसेबिलिटी संस्थेने खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचे बहुमूल्य असे कार्य केल्याचे बोडके यांनी बोलताना सांगितले.
पीपल विथ डिसेबिलिटी संस्थेचे नाशिक कोऑर्डिनेटर समाधान शिंदे व प्रोजेक्ट कॉर्डिनेटर रवींद्र पाटकर यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिककर दिव्यांगांना लाभ मिळाला सदर कार्यक्रमास नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग दिव्यांग भवन यांचेही सहकार्य लाभले.
याप्रसंगी बब्बू भगत, योगेश वाणी, विजय पाटील, मुकेश कोठुळे, प्रितेश बागुल, समाज कल्याण विभाग सहाय्यक अधीक्षक भारत खैरनार, वाळूंज आदी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्ती सामाजिक जबाबदारी असून ही जबाबदारी झटकून चालणार नाही – दत्तू बोडके



