धर्म
वैष्णवदेवी मंदिरही रडारवर. दानपेटीत अर्पण केले जाणारे चांदीचे दागिने बनावट.
'देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा'

विशेष प्रतिनिधी : “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा”
मागील काही दिवसांपासून भारतातील अनेक मंदिरात अनेक अडचणी निर्माण होतांना दिसत असून प्रसिद्ध वैष्णवदेवी मंदिरही यातून सुटले नाही.
वैष्णवदेवी मंदिरातील दानपेटीत अर्पण केले जाणारे चांदीचे दागिने बनावट असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वैष्णवदेवी मंदिरात अर्पण केलेल्या 550 कोटींच्या चांदी पैकी फक्त 30 कोटींची चांदी खरी असून 20 टन चांदीपैकी फक्त 5 टक्के चांदी शुद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रसिद्ध त्रंबकेश्वर मंदिर, शिर्डी संस्थान, कपाळेश्वर मंदिर आणि अनेक मंदिरात होणारे गैरप्रकार नुकतेच बाहेर आले असतांना आता भारतातील प्रसिद्ध वैष्णवदेवी मंदिर रडारवर सापडले आहे.