क्राइम

महाराष्ट्र दिनी साक्री येथे लाचखोर अधिकारी ताब्यात.

साक्री प्रतिनिधी : रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीच्या अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारणाऱ्या साक्री पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी नितीन नारायण वारकर ( ५२, रा. बाहुबली नगर, प्लॉट नं. ५२, साक्री रोड, धुळे) असे कारवाई झालेल्या तांत्रिक सहाय्यकाचे नाव असून साक्री पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावास महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहीरीच्या खोदकामासाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यासाठी साक्री पंचायत समिती मार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, या कामाच्या प्रगतीनुसार संबंधित लाभार्थ्यास अनुदानाचे एकूण १५ हप्ते प्राप्त झाले होते. यानंतर उर्वरित अनुदान मंजूर होण्यासाठी तांत्रिक सहाय्यक नितीन वारकर यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विहिरीचे मोजमाप करून एक लाख ६२ हजार ३२० रुपयांचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेत नोंदविले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!