शिक्षण खात्याच्या तिजोरीत खळखळात? ऐन अक्षयतृतीयेत शिक्षकांना करावा लागणार ‘वेतन बंदी’ चा सामना?

मागील महिन्यापासून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उशीरा होत असलेल्या वेतनामुळे त्रस्त आहेत.
शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून अडथळे निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अनेक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन होण्याची शक्यता कमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षण विभागाच्या अडथळ्यांमुळे (बॅरिअर्स) संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही.शाळा डिजिटायझेशन तसेच राज्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त आहेत किंवा संचमान्यतेमध्ये काही अडचणी असतील असे नियमित वेतन देयके शिक्षणाधिकारी लॉगिनला जात होती परंतु ती सुविधा बंद केल्यामुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन होत नाही आणि संचमान्यता दुरुस्ती होत नाही तो पर्यंत संबंधीत शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही अश्या अनेक बाबी शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहेत. यासाठी अनेक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाचा पाऊस पडत आहे.
महिलाशिक्षक कर्मचारी सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का?
खरोखर तांत्रिक त्रुटी आहेत की शिक्षण खात्याच्या तिजोरीत खळखळात आहे? याची उकल होणे गरजेचे असून शासन या बाबतीत काय निर्णय घेते याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.



