Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperमहाराष्ट्रराजनीति

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोग सरपंच पोटनिवडणूकीत देशमुख विजयी.

संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव.

बीड प्रतिनिधी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील तात्कालीन सरपंच तत्कालीन सरपंच यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निकालात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला.

राजकारण कि जनमत?
गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव केला होता. संतोष देशमुख यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे वाटतं असतांना अर्ज माघारीच्या दिवशी फक्त 5 उमेदवारांनी माघार घेतली मात्र स्वरूपानंद देशमुख हे ठाम राहिले.

आठवणी की प्रतिष्ठा

निवडणुकीच्या प्रचारात संतोष देशमुख यांची दोन्ही मुले वैभवी आणि विराज यांनी कंबर कसून प्रचार केला. प्रचारदरम्यान मतदारांना भावनिक आव्हान केले. मतदारांनीही सहानभूती दाखवली परंतु सहानभूती पेक्षा स्थानिक समीकरणे वरचड ठरली.

मागील वेळेस संतोष देशमुख अवघ्या 9 मतांनी विजयी झाले होते परंतू यावेळी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना 92 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयाने गावात नवा सत्तासंघर्ष पाहण्यास मिळणार आहे.

विजय आणि पराजय :

विजयी उमेदवार   : स्वरूपानंद देशमुख
पराजित उमेदवार : अश्विनी संतोष देशमुख
विजयाचे अंतर     : 92 मते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!