Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
Uncategorized

धरणगाव रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारण्याची मागणी

🚆 धरणगाव रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारणीची तातडीची गरज🚆
इंग्रज काळात धरणगाव ही एक अत्यंत मोठी आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ होती. आजही धरणगाव तालुका शेती, व्यापार आणि उद्योग यासाठी ओळखला जातो. मात्र, योग्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे या भागाचा पूर्ण क्षमतेने विकास होत नाही.
धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का (Goods Yard) उभारण्यास मंजुरी मिळाल्यास तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल.
धरणगाव रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांच्या रेल्वे स्थानकांवर मालधक्का सुविधा उपलब्ध आहे, मात्र धरणगाव अजूनही वंचित आहे. हा अन्याय आणखी किती दिवस सहन करायचा* ? *आता धरणगावसाठी मालधक्का मंजूर करणे अत्यंत गरजेचे आहे.*

🌾 शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा
कापूस, केळी, मका, धान्य यांसारख्या कृषी उत्पादनांची रेल्वेमार्फत जलद आणि स्वस्त वाहतूक शक्य होईल. शेतकऱ्यांना थेट मोठ्या बाजारपेठांशी जोडता येईल, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
🏭 स्थानिक उद्योगांना चालना
लघुउद्योग, जिनिंग-प्रेसिंग, कृषी प्रक्रिया उद्योग यांना माल पाठवणे आणि कच्चा माल आणणे सोपे होईल. त्यामुळे नवीन उद्योग उभारण्यासही प्रोत्साहन मिळेल.
📦 व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर
वाहतूक खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि व्यापार अधिक स्पर्धात्मक बनेल. मोठ्या शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे व्यापाराचा विस्तार होईल.
👷 रोजगार निर्मिती
मालधक्का सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
🌍 तालुक्याचा सर्वांगीण विकास
नवीन धरणगाव तालुक्याचा आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकास झपाट्याने होईल. संपूर्ण परिसर प्रगतीच्या मार्गावर जाईल.
👉 त्यामुळे शासनाने धरणगाव रेल्वे स्थानकावर तात्काळ मालधक्का उभारणीस मंजुरी द्यावी, ही सर्व नागरिक, शेतकरी, व्यापारी व उद्योजकांची एकमुखी मागणी आहे.
धरणगाव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म येथे मालधक्का सुरू होण्याबाबत
सिमेंट कॉटन ज्वारी मक्का उडीद मुंग सोयाबीन साठी गुड्स रॅक (मालधक्का) सुरू होण्याबाबत खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रयत्न करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!