Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
Uncategorizedराजनीति

धुरंधर नगरसेविका : सभापती होताच सविता तोरणे रगडे यांची धडाकेबाज सुरुवात.

उल्हासनगर परिसराचे आरोग्य उल्हासीत होणार.

उल्हासनगर प्रतिनिधी : महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या नवनिर्वाचित सभापती सविता तोरणे रगडे यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आपल्या दालनात आज आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीस मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार, तसेच मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. धर्मा आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उल्हासनगर शहरातील विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यात विशेषतः शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन, डंपिंग ग्राउंडची स्थिती, तसेच वैद्यकीय आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषध वितरण यावर भर देण्यात आला. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उन्नतीकरणासाठी (अपग्रेडेशन) आवश्यक उपाययोजना, भटके कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण आणि नागरिकांसाठी ॲम्बुलन्स सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

या सर्व विषयांवर

लवकरच सकारात्मक ठोस पावले उचलण्याचा निर्धार सभापती सविता तोरणे रगडे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!