खबर विशेष संपादकीय : (जेष्ठ पत्रकार जयप्रकाश बाळेकर)
सर्व महाराष्ट्र वासियांच्या अभिमानाचा दिवस 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तत्पूर्वी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचनेप्रमाणे राज्ये निर्माण झाली. परंतू मराठी भाषिकांना एकसंघ राज्य ‘न’ देता निरनिराळ्या राज्यांशी जोडून दिले. गुजरातचा काही भाग त्याला द्विभाषिक नाव दिले. मध्यप्रदेशचा काही भाग त्याला मध्य प्रांत वऱ्हाड (C. P & Berar) म्हणायचे. कर्नाटकचा काही भाग बेळगाव, कारवार मराठीसाठी एकसंघ प्रांत नव्हता.
मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करून आंदोलन केले. या आंदोलनात मोरारजी देसाई सरकारने बेछूट गोळीबार केला त्यात 117 लोक हुतात्मे झाले.
आंदोलनाची तिव्रता पाहुन नेहरू सरकारने महाराष्ट्र राज्य निर्मितीची घोषणा केली व 1 एप्रिल 1960 हा दिवस ठरविला. परंतू श्री डांगे यांनी कडकडून विरोध केला कारण 1 एप्रिल (एप्रिल फूल) तर 1 मे जागतिक कामगार दिन म्हणून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आज 66 वा वर्धापन दिन.

या 66 वर्षात महाराष्ट्र राज्यात अनेक घडामोडी झाल्या. काँग्रेस सरकारच्या काळातील प्रगती धीम्या गतीने झाली विकास हा मुद्दाच नव्हता. सरकारी खात्यात भ्रष्टाचार मोठया प्रमाणात होता. अन्न धान्य भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. निश्चित शैक्षणिक धोरण नव्हते. दळववळणाच्या साधणार दुर्लक्ष होते. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांत विदर्भावर अन्याय होत होता. त्यामुळे वेगळा महाविदर्भ यासाठी मागणी झाली. ही मागणी प्रथम ब्रिजलाल बियाणी यांनी केली होती. 66-67 च्या काळात जाबुवंतराव धोरे यांनी प्रखर आंदोलन करून हा प्रश्न ऐरनीवर आणला. धोरे यांच्या आंदोलनातून कृषी विद्यापीठ मिळाले. शैक्षणिक मेडिकल कॉलेज यांची सुद्धा वाणवा होती. हळूहळू जनता जागृत व्हायला लागली. नवीन शिक्षित पिढी पुढे यायला लागली. 2014 पूर्वी राजकारणात विलासराव देशमुख, आर. आर. आबा असे दिग्गज नेते असतांना सुद्धा प्रगतीचा वेग हवा तेव्हडा मिळत नव्हता नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना सत्तानतराचा नवा अध्याय बघण्यास मिळाला. राजकारण बाजूला ठेवले तर विकासाचा जोर धरण्यास सुरुवात झाली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना आधार दिला. योग्य कृषी धोरण, शिक्षण क्षेत्र, महिला विकास, सुरक्षा व्यवस्था यांवर भर दिला. सर्व सुरळीत असतांना 2019 मध्ये करोना काळात प्रगतीला खिळ बसला. महाराष्ट्र राज्याचा विकास मागे गेला. यानंतर च्या नेतृत्वात काही प्रमाणात पुन्हा एकदा विकासाकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र घडण्यास सुरुवात झाली.
परंतू, विकास होत असतांनाच नुकत्याच लव्ह जिहाद, भोंदूगिरी, भाषावाद आणि इतर सर्व बाबींमुळे महाराष्ट्र पोखरला जातोय? सरकार आणि प्रशासन आपल्या पद्धतीने निपटारा करतीलच परंतु अश्या परिस्थितीत जनतेचा सहभाग किती महत्वाचा असतो हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. एका बाजूला रस्ते, समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग, कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग, मुंबई वढोडरा महामार्ग, मुंबई – पुणे मिसिंग महामार्ग त्याचप्रमाणे शैक्षणिक दर्जेदार उपक्रम, आरोग्य सेवा, महिला – बालविकास अश्या प्रकारच्या अनेक धोरणांची प्रगती होत असतांना कधीही भरून ‘न’ निघणारी अजित पवार यांनी त्रुटी परंतू, नुकत्याच लव्ह जिहाद, लँड जिहाद, भोंदूगिरी, भाषावाद आणि इतर सर्व बाबींमुळे महाराष्ट्र पोखरला जातोय? सरकार आणि प्रशासन आपल्या पद्धतीने निपटारा करतीलच परंतु अश्या परिस्थितीत जनतेचा सहभाग किती महत्वाचा असतो हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. सगळीकडे सुसंगत पणे महाराष्ट्र राज्य वरचढ होत असतांनाच आपल्या राज्यातील आदिवासी भाग, डोगरदऱ्यात राहणारे नागरिक यांच्या पर्यंत विकासाचे धोरण पोहचण्यास अजून किती कालावधी लागणार? असचं काहीस विचारतोय महाराष्ट्र!
‘बदलता महाराष्ट्र’ की ‘बदला महाराष्ट्र’ असे घोषवाक्य तयार होणे उचित राहील?
प्रश्न मनाचा आणि महाराष्ट्राच्या मानाचा :
मोठमोठे महामार्ग तयार होत असतांना गल्लीबोळातील परिस्थिती जैसे थे असण्यासाठी जबाबदार कोण? स्थानिक नेते? स्थानिक नागरिक? की स्थानिक प्रशासन? एकीकडे शैक्षणिक दर्जा मोठया प्रमाणात बदलत असतांना मराठी शाळा बंद करण्याची वेळ महाराष्ट्रात का आली? एकीकडे पाणीप्रश्न मोठया प्रमाणात सुधारत असतांना पिण्याच्या पाण्याची वेळ झाली म्हणून धावपळ करणारा शहरी आणि ग्रामीण नागरिक कधी थांबा घेणार? एकीकडे मेट्रो सारख्या सुविधा वायुवेगाने धावत असतांना त्याच राज्यात आणि राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशी मोठया प्रमाणात असतांना परिवहन महामंडळ डबघाईस का म्हणून जात असावे? एकीकडे भरमसाठ नोकरीच्या जाहिराती असतांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जागतिक कामगार दिवस साजरा कारण्याऱ्या परिसरात त्याच ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी वन वन भटकणारा युवा वर्ग कधी यशस्वी होणार? महिलांसाठी विविध धोरण असतांना वाढत जाणारे अत्याचार आणि 1500 रु साठी वाढत जाणाऱ्या रांगा कधी कमी होणार? एकीकडे शिवबाच्या तलवारीने भगवा झेंडा फडकवणारा मावळा आणि दुसरीकडे चाकू, सुरे चॉपर ने गुंडगिरी करणारा आरोपी वर्ग महाराष्ट्र लाल करण्यापासून कधी संपणार? एकीकडे शेतकरी राजा आणि शेती धोरणाचा विकास होत असतांना शेतात पाणी घालन्यासाठी मध्य रात्री झोपूतून उठणारा राजा सुखाची झोप कधी घेणार? अजूनही हक्काच्या मागण्यांसाठी करावी लागणारी आंदोलने कधी थांबणार? अश्या अनेक प्रश्नांनी महाराष्ट्र राज्याच्या गळ्याला लागलेला फास काढण्याचे काम सद्याचे सरकार करेल ही अपेक्षा आहेच, परंतू महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. नाहीतर या 6 g स्पीड असलेल्या ऑनलाईनच्या जगात, महाराष्ट्राला ऑफलाईन होण्यास वेळ लागणार नाही.
नक्कीच नागरिकांना आपल्या ‘बुद्धीचा नट’ सुदृढ करण्यासाठी योग्य विचारांच्या ‘ॲडजस्टेबल पान्या’ ची गरज आहे.
असो…जाता जाता 66 व्या महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देवून नेहमीचाच प्रश्न मनात ठाण मांडून बसलाय.
महाराष्ट्र! महान राष्ट्र कधी होणार?
©लेखक जेष्ठ पत्रकार आहेत.