E-Paper

कडाक्याच्या ‘उन्हात’ बडगुजरांच्या ‘सावलीचा’ आधार.

त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर हिट शेल्टर

“पहिल्यांदाच कोणा नेत्याकडून झालेला कौतुकस्पद उपक्रम”

नाशिक (त्रिमूर्ती चौक) : येथील सिग्नलवर वाहनचालकांना कडाक्याच्या उष्म्या पासून बचाव करता यावा यासाठी प्रायोगिक तत्वावर हिट शेल्टर उभारण्याचा संकल्प भाजपा नगरसेवक व जेष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी जोडलाय. ही संकल्पना युवा नेते दिपक बडगुजर यांची आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात दिवसेंदिवस उष्णता वाढत असून नाशिक चे तापमान विदर्भासोबत बरोबरी करत असल्याचे दिसत आहे. रस्तावर जातांना कितीही खबरदारी घेतली तरी उष्णते पासून बचाव करणे अवघड होत आहे.

सिग्नलवर 1 किंवा 2 मिनिट प्रतीक्षा करतांना अंगाची लाही लाही होत असते. यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळण्यासाठी नवीन नाशिक येथील त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर ‘थोडीशी विश्रांती सावली सोबत’ ही टॅगलाईन घेऊन हिट शेल्टर उभारण्यात आलंय. नाशिक शहरात पहिल्यांदाच अश्या प्रकारची सुविधा कोणा नेत्याकडून करण्यात आल्याने थोडे का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांकडून बडगुजर यांचे कौतुक होत असून त्यांचे आभार मानन्यात येत आहे.

 

पुढील काळात 4 ते 5 मोठया सिग्नलवर अश्या प्रकारचे हिट शेल्टर उभारण्याचा मानस आहे असे दीपक बडगुजर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!