E-Paper

शिक्षक की सर्वेअर? : शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जबरदस्तीने सर्वे कामे देणे बंद करा! 

शिक्षक की सर्वेअर? : शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जबरदस्तीने सर्वे कामे देणे बंद करा!

जळगाव : शासनाने राज्यातील शिक्षकांना २ मे ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या जाहीर केलेल्या असतानाही अनेक ठिकाणी मुख्याध्यापक व संस्थाचालक शिक्षकांकडून विविध सर्वे, विद्यार्थी ऍडमिशन साठी सर्वे, नोंदणी, घरभेटी व इतर कामे करून घेत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.

शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना मिळालेल्या अधिकृत सुट्ट्यांमध्ये अशा प्रकारे मानसिक त्रास देणे अन्यायकारक आहे. शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत काही संस्था शिक्षकांवर दबाव टाकत आहेत.

शिक्षकांनाही कुटुंब आहे, आरोग्य आहे, वैयक्तिक आयुष्य आहे. सुट्टी हा त्यांचा अधिकार आहे, उपकार नाहीत. त्यामुळे शासनाने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन दोषी मुख्याध्यापक व संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिक्षकांनकडून होत आहे. उन्हाळी सुट्टीत कोणत्याही प्रकारची जबरदस्तीची सर्वे कामे शिक्षकांकडून करून घेऊ नयेत, असे स्पष्ट व कडक आदेश शिक्षण विभागाने काढावेत, अशी राज्यातील शिक्षकांची तीव्र मागणी आहे.

शिक्षकांची बिकट अवस्था : (43° C) असणाऱ्या कडाक्याच्या तापमानात शासनाकडून जनगणनेच्या कामांसाठी शिक्षकांचा वापर सुरु असतांनाच संस्थाचालकांकडून सर्वे आणि नोंदणीच्या कामांसाठी सक्ती करण्यात आल्याने शिक्षक वर्गकडून संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!