E-Paper

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्षांची लागवड – समाधान देवरे.

अशोक नगर परिसरात भव्य दिव्य कार्यक्रम

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण उपक्रम

नाशिक प्रतिनिधी: येथील अशोक नगर भागात मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा केला जाणार आहे.

दि. 17 मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस असून मंत्री महाजन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीही बॅनर लावू नये, पुष्पगुच्छ आणू नयेत अश्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या त्याला अनुषंगुण प्रभाग 10 चे नगरसेवक आणि सभापती समाधान देवरे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर कार्यक्रमात परिसरातील मोकळ्या जागेत 100 वृक्ष लागवड केली जाणार आहे. आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके आहेर, भाजपा नेते शहराध्यक्ष सुनील केदार, संदीप जाधव, उद्यान विभाग उपायुक्त विवेक भदाणे यांसोबत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून यांसोबत भाजपा कार्यकर्ते आणि नेते यांची उपस्थिती लाभणार आहे.

आज 17 मे रोजी सकाळी 10.00 वा. कातकडे नगर, जाधव संकुल, अशोक नगर, सातपूर, नाशिक या ठिकाणी सदर उपक्रम होणार असून नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती आणि नगरसेवक समाधान देवरे यांनी केले आहे.

चांगल्या दिवशी चांगला उपक्रम राबवून सामाजिक भान राखले आहे असे समाधान देवरे यांनी खबर 24 LIVE शी बोलतांना सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!