E-Paperलोकल न्यूज़
48 तासांकरीता कल्याणकरांचा पाणी प्रश्न गंभीर

कल्याण प्रतिनिधी : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या वाढत्या पाणीपातळीचा फटका कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला सलग दुसऱ्या दिवशी बसला आहे. काल नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरल्यामुळे पाणीपुरवठा बंद असतानाच आता उल्हास नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी तुटल्याने बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद झाला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४८ तास लागण्याची शक्यता असल्याने कल्याणकरांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.




