राजनीति

सुभाष भामरे यांची नियुक्ती

भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती

भिवंडी तालुक्यातील मूठवळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष भामरे यांची नुकतीच भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये खालच्या फळी पासून कार्यरत असलेले सुभाष भामरे हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांच्या नेतृत्वात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील आणि ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष भामरे यांची नियुक्ती झाली. सुभाष भामरे हे माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. ठाणे जिल्हा ग्रामीण भागात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अथक परीश्रम घेणार असून आज खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून पक्षीय विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही असे मत सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!