Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
लोकल न्यूज़

‘तूझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे’ – समीर भडांगे

नाशिक : राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा कायमच भासत असतो. कोणाचे रक्त कोणाचा जीव कधी वाचवेल याला वेळ आणि काळ नसतो. त्यामुळे येणाऱ्या 14 एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक संघटना, मंडळे, राजकीय पक्ष यांनी दिलखुलासपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन डी एस फॉउंडेशनचे या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष समीर भडांगे यांनी केले आहे. महापुरुषांच्या जयंत्या सामाजिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून साजऱ्या केल्या तर त्याचा आनंद वेगळाच असतो. जयंती साजरी करत असतांना महापुरुषांनी समाज कसा घडवला याची प्रेरणा घेऊन आपणही समाजाचे काहीतरी देणेकारी आहोत ही भावना जपणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचे रान करत समाजासाठी कार्य केले त्यांची जयंती सर्वांनी सामाजिक कार्य करत साजरी करावी असे समीर भडांगे यांनी ‘खबर 24 LIVE’ शी बोलतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!