क्राइम

‘मी प्रेग्नेंट आहे’, – निदा खान. नाशिक TCS लैंगिक आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा दावा.

मी प्रेग्नेंट आहे’, नाशिक TCS लैंगिक शोषण प्रकरणात नवा ट्विस्ट, फरार ‘दबंग मॅम’ निदा खानचा सापडला ठिकाणा.
‘दबंग मॅम’ म्हणून ओळख असलेल्या निदा खान हिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती मुंबईत असून गर्भवती आहे. सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने आपल्या अर्जात वैद्यकीय स्थितीला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून नमूद केले आहे. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग नाशिक मध्ये दाखल झाले असून बळी पडलेल्या महिलांशी सवांद साधणार असल्याचे सांगितले.

अटक न करता सहकार्य करण्याची तयारी
निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे.दुसरीकडे निदा खान गर्भवती असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. पहिल्याच बाळाच्या प्रतिक्षेत असताना जर अटक झाली तर पोटातील बाळावर हा मोठा अन्याय असं तिचं म्हणणे आहे. तसेच अटक न करता,तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचाही दावा निदा खान हिने केला आहे. तसेच तुरुंगातील आरोपी शफीला झालेल्या मारहाणीमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही निदा खाननं उपस्थित केला आहे. फरार आरोपी निदा खान सध्या मुंबईत किंवा मुंबईजवळ असल्याची माहिती मिळत आहे.

मोबाईल डेटा ठरणार महत्वाचा पुरावा
या प्रकरणाचा तपास केवळ साक्षीपुरता मर्यादित न राहता तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित करण्यात आला आहे. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, तसेच इतर डिजिटल माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!