Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
लोकल न्यूज़

योगेश गांगुर्डे यांच्या कडून आंदोलनाचा इशारा

दूषित पाणी पुरवठ्यामुळे जनतेचा जीव धोक्यात.

नवीन नाशिक भागातील रायगड चौक येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असून यांमुळे परिसरातील नागरिक हैरान झाले आहेत. पिण्याच्या पाण्याला दुर्गधी येणे, पाण्यात आळ्या आढळून येणे हे रोजचेच झाले असून प्रशासनास लक्षात आणून देखील कोणतीही ठोस कारवाई होत नसून मनपाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

या प्रकारमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असून याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार आहे. वारंवार सूचित करूनही दूषित पाणी मिळणार असेल तर पाणीपट्टी का भरावी? असा सवाल परिसरातील महिला करीत आहेत. येत्या दोन दिवसात कारवाई ‘न’ झाल्यास परिसरात येणारे हेच गढूळ पाणी घेऊन आंदोलन करणार असल्याचे एकनिष्ठ युवा फॉउंडेशन आणि छावा क्रांतिवीर सेनेचे शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी खबर 24 लाईव्ह शी बोलतांना सांगितले.

परिसरातील नगरसेवकांनी राजकारण थोडे बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी योगेश गांगुर्डे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!