E-Paperएज्यूकेशन

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आणि तरुणीच्या हातात नोटीस

वसतिगृह वार्डन ची अरेरावी.

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसतिगृहात कुलरची व्यवस्था करावी अश्या सूचना देवूनही सामाजिक न्याय विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर विध्यार्थीनी आकांक्षा उके हिने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. याचा राग मनात ठेवून वसतिगृह प्रशासनाने सदर युवतीस वसतिगृह सोडण्यासाठी नोटीस बजावली.

सदर विद्यार्थिनी अमरावती येथील गरीब शेतकरी कुटूंबातील असून MBA पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. उन्हाळ्याच्या झळा प्रत्येकाला बसत असून वसतिगृहात कुलर ची व्यवस्था करावी अश्या सूचना मुख्यमंत्री यांनी देवूनही त्याबाबत कारवाई झाली नसल्याने विध्यार्थीनीने मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली त्यामुळे सदर विधार्थीनीस वसतिगृह सोडण्यासाठी नोटीस देण्यात आली. त्यामध्ये तू नोकरी करीत असून या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही असे नमूद करण्यात आले.

परंतू तरुणी MBA प्रथम वर्षाचे शिक्षन घेत असून तीला त्या करिता इंटर्नशिप करावी लागत आहे असे सदर तरुणीकडून सांगण्यात आले.

अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थी नंतर विध्यार्थीनीस दिलेली नोटीस परत घेऊन पुन्हा प्रवेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!