E-Paperएज्यूकेशनराजनीति

सर्वोदय शिक्षण संस्थेत ‘सहकार’ ला विजयी मुकुट

सर्वसाधारण महिला राखीव गटात विद्या प्रवीण पाटील यांचा दणदणीत विजय

चाळीसगाव : तालुक्यातील उंबरखेडे येथील नामांकित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत चेअरमन विकास पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने १९ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

संस्था सचिव उदेसिंग पाटील यांच्या स्मृती पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. उदेसिंग पाटील हे स्वतः  या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

१६ ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानात ९३ टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!