Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

‘खिळे मुक्त’ अभियान ‘यशस्वी’ करणारच – निसर्ग सेवक अमित कुलकर्णी.

नाशिक : शहरातील सार्वजनिक झाडांवर खिळे ठोकणे, अनधिकृत वायरिंग करणे व विद्युत लाइटिंग लावणे या गंभीर प्रकारांविरोधात “खिळेमुक्त वृक्ष अभियान” अंतर्गत निसर्गसेवक युवा मंचतर्फे मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत येतोय.

दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे यासंदर्भात लेखी तक्रार तसेच पुराव्यादाखल छायाचित्रे सादर करण्यात आली होती. त्यानंतर वारंवार स्मरणपत्रे, ई-मेलद्वारे पाठपुरावा तसेच वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई अथवा लेखी माहिती देण्यात आलेली नाही.

विशेषतः तिडके कॉलनी, कॉलेज रोड तसेच नाशिक शहरातील सर्व ६ विभागांमध्ये आजही झाडांवर खिळे, वायरिंग व अनधिकृत लाइटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब “Maharashtra (Urban Trees Protection) Act, 1975” तसेच “Defacement of Property Act, 1995” अंतर्गत दंडनीय आहे.

प्रशासनाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाच्या निषेधार्थ, निसर्गसेवक युवा मंचतर्फे पुढील ३ ते ४ दिवसांत नाशिक महानगरपालिका कार्यालयाबाहेर शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.

तथापि, आंदोलनापूर्वी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करावी व त्याबाबतची लेखी माहिती द्यावी, ही आमची अंतिम अपेक्षा आहे.

“खिळेमुक्त वृक्ष अभियान” हा नाशिक शहरवासीयांचा पर्यावरण संवर्धनासाठीचा नागरिक उपक्रम असून, या मोहिमेला प्रशासनाची सक्रीय साथ लाभावी, हीच अपेक्षा आहे.

अमित कुलकर्णी
अध्यक्ष – निसर्गसेवक युवा मंच.
प्रणेते – खिळेमुक्त वृक्ष अभियान, नशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!