देश

प.बंगालच्या : सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, बंगालमध्ये खळबळ

प. बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक संपल्यानंतर उफाळला हिंसाचार.

अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेले सुवेंद्रु अधिकारी यांच्या पीएची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मध्यमग्राममधील दोहारिया इथं ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बंगाल मध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. सुवेंद्रु अधिकारी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे. त्यांचं नाव आघाडीवर आहे. अशातच मध्यमग्राम भागात अधिकारी यांचे खासगी पीए चंद्रनाथ रथ यांची गोळी झाडून हत्या कऱण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसोबत जात होते. त्यावेळी अचानक दुचाकी वरून 3 जण आले आणि त्यांनी हल्ला केला. यामध्ये रथ यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

चंद्रनाथ रथ कोण होते?

चंद्रनाथ रथ हे सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय समजले जातात. ते त्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते. एक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. निवडणुकीच्या काळात रथ यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!