E-Paperलोकल न्यूज़

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ताफा धडाडणार : नाशिक मध्ये आज विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

सोबत अनेक मंत्री आणि नेत्यांची हजेरी. कुंभमेळा कामे लवकरात लवकर संपविण्यासाठी नागरिकांचे साकडे.

आज नाशिक येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा.

नाशिक : येथे आज विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते आयोजित केला असून यामध्ये अनेक मंत्री आणि नेते हजेर असणार आहेत.

कार्यक्रमात नव्याने निश्चित करण्यात आलेला बदल
गंगापूर गाव व प्रभाग क्रमांक ०८ च्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य व प्रशस्त भाजी मार्केटचा शुभारंभ व सभागृह लोकार्पण. गंगापूरगाव राजवाडा येथील सभागृह व गार्डन लोकार्पण. गंगापूरगाव गोदावरी परिचय उद्यान लोकार्पण. वैकुंठ रथ लोकार्पण समारंभ सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळ ४:०० वा. क्रांती चौक, गंगापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.या शुभारंभा प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती उपमहापौर विलास शिंदे यांनी केली आहे.

कार्यकम प्रसंगी अनेक नेते राहणार उपस्थित :

खासदार मा. श्रीकांत शिंदे यांच बरोबर उदय सामंत (उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य),  दादाजी भुसे (शालेय शिक्षण मंत्री), आमदार सुहास कांदे (राज्यमंत्री) खासदार राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा, भाऊसाहेब चौधरी (संपर्क प्रमुख शिवसेना सचिव) आमदार सीमा ताई महेश हिरे, मा. आनंद परांजपे (शिवसेना नेते) हिमगौरी ताई आडके (महापौर नाशिक) यांचबरोबर अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

नाशिक शहरात रस्ताची झालेली दुरावस्था या नेत्यांना अडचण निर्माण करेल का?

विकास कामे झालीच पाहिजेत परंतु या सद्या खड्डेमय नाशिक शहरात उटघाट्नासाठी येणाऱ्या नेत्यांच्या ताफ्याने नाशिक शहरात अजूनच वाहतूक अडचण निर्माण होऊ शकते. या अडचणी कडे नेत्यांचे लक्ष गेल्यास कुंभमेळा विकासकामे लवकर होण्याची चिन्हे दिसू शकतात.

 

नाशिक शहरात कुंभमेळा विकास कामे लवकरात लवकर संपवून नाशिककर जनतेचा श्वास मोकळा करावा अशी मागणी कदाचित नागरिकांकडून करण्यात येऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!